Tuesday, 23 June 2020

MSEB Hidden Charges महावितरण कंपनीने ग्राहकांवर लादले अतिरिक्त चार्जेस

माननिय श्री फुलसिंह राठोड 
जनसंपर्क अधिकारी 
महावितरण अमरावती 

महोदय, 


महावितरण कंपनी कडून अ‍ॅक्च्युअल इलेक्ट्रीक बिला व्यतिरिक्त अतिरिक्त चार्जेस फार मोठ्या प्रमाणात आकारले जाते
हे अतिरिक्त शुल्क कमी करण्याची खरी गरज आहे. 
ते अतिरिक्त चार्जेस खालील प्रमाणे आहेत..


➡️ महावितरण कंपनीने विज बिलामध्ये चार प्रकारे भरमसाठ अतिरिक्त शुल्क आकारणी केल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणार आहे. 

➡️महावितरण कंपनी ने ग्राहकांवर लादलेले अतिरिक्त शुल्काचे वेगवेगळे चार प्रकार ग्राहकांना माहितच नाही. 

➡️ग्राहकाने प्रत्यक्षात वापरलेल्या वीजेच्या  बिलातील रकमेव्यतिरीक्त आकारण्यात आलेले हे अतिरिक्त शुल्क हे एप्रिल महिन्यात मुळ वीज बीलाच्या ७७ टक्के जादा आहे. 

➡️म्हणजे एखाद्या ग्राहकाचे एप्रिल महिन्याच्या वीज बीलाची मुळ रक्कम १०० रूपये असेल तर त्यावर ७७ रूपये अतिरिक्त शुल्काची आकारणी करण्यात आली आहे. म्हणजे त्या ग्राहकाला १७७ रूपये बिल भरावे लागणार आहे. 

➡️अतिशय छुप्या पध्दतीने महावितरण कंपनीने एप्रिल महिन्याच्या वीज देयकांत ७७ टक्के, मे महिन्याच्या विज बिलात ५४ टक्के आणि जुन महिन्याच्या विज बिलात ५४ टक्के अतिरिक्त वीज शुल्क  ग्राहकांवर लादले आहे. 

हे चार प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जातात.. 
➡️१)फिक्स चार्जेस म्हणजेच स्थिर आकार 

➡️२)व्हिलींग चार्जेस म्हणजेच वहन आकार 

➡️३) एफसीए चार्जेस म्हणजेच फ्युएल कॉस्ट अॅडजेस्टमेंट चार्जेस.. इंधन समायोजन आकार 

➡️४)एकूण वीज देयका च्या १६ टक्के अतिरिक्त वीज शुल्क म्हणजेच वीज शुल्क १६ %

👉अशा चार वेगवेगळ्या प्रकारे शुल्काची आकारणी करण्यात आली आहे. यातील "फ्यूल कॉस्ट अॅडजेस्टमेंट" इंधन समायोजन आकार.. या अतिरिक्त शुल्काची मे आणि जुन महिन्याच्या बिलात आकारणी केलेली नाही. विशेष म्हणजे ग्राहकांवर लादण्यात आलेले हे चारही अतिरिक्त शुल्क ज्या शुल्काला महावितरण "आकार" असे म्हणते हे ग्राहकाने प्रत्यक्षात वापरलेल्या" वीजेच्या आकारा व्यतिरिक्त" आहेत.

हे चार वेगवेगळे "आकार शुल्क" ग्राहकांवर लादण्यात येतात. हे शुल्क कमी झाले की मुळ देयकाची रक्कम कमी होईल. या करीता काही ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे 🙏 

उदाहरण दाखल.. 
आजच माझ्या घरचे तीन महिन्याचे एकत्रीत बील आहे. त्यातील एप्रिल महिन्याचे बील उदाहरण दाखल देतो.. 

१)एकुण वापरलेल्या युनिटचा वीज आकार - *८२४. २० रूपये* 

२)स्थिर आकार फिक्स चार्जेस - *९० रूपये* 

३)वहन आकार व्हिलींग चार्जेस - *२३२.९६ रूपये* 

४)इंधन समायोजन आकार म्हणजेच फ्युएल कॉस्ट अॅडजेस्टमेंट चार्जेस - *११४.४६ रूपये* 

५)वीज शुल्क १६ %..(वरील १+२+३+४ ची बेरीज केल्यानंतर आलेल्या रकमवेर) एकूण विज बिलाच्या १६ टक्के चार्जेस - *२०१. ८६ रूपये* 

👉माझे अॅक्चूअल बील बघा आणि अतिरिक्त चार्जेस बघा 

👉प्रत्येकाने त्यांचे आलेले बील तपासावे. बीलाच्या मागील बाजूस हे सर्व चार्जेस दिलेले आहेत 

👇👇👇👇👇
Actual bill - extra charges 
A)824.20-April --639.28
B)1349.05 -May -738.72
C)1347.12 -June - 731.68


महावितरण कंपनी मार्फत मुळ वीज वापरा च्या एकूण बिलावर हे चार प्रकारचे अतिरिक्त चार्जेस लावले जातात ते चार्जेस कमी करण्याची गरज आहे म्हणजे आपल्याला बिल कमी येईल 🙏 🙏 🙏 🙏 🙏 

🔴संजय पाखोडे 
९८२२२७४६७७ 
९८२३०२३८७५ 
 sanjay.pakhode@gmail.com

Saturday, 11 April 2020

सामाजीक बांधिलकी जपणारा महेश तिवारी

सामाजीक बांधीलकी जपणारा टीव्ही जर्नेलीस्ट महेश तिवारी 

पत्रकारीता करतानाच सामाजीक बांधिलकीची जाणीव ठेवत अनेक पत्रकार त्यांचं पत्रकारीतेत कार्य करीत आहेत. गडचिरोली सारख्या महाराष्ट्राच्या टोकावरून टिव्ही माध्यंमाकरीता रिपोर्टींग करणारा महेश तिवारी हा सामाजीक बांधिलकी जपणारा पत्रकार. पत्रकारीता करताना समजाप्रती आपलं काहीतरी
 
 
योगदान लागतं ही जाणीव ठेवत महेश तिवारीने दोन चिमुकल्याची त्यांच्या आईशी भेट घडवून आणली. लॉकडाऊन च्या काळात अडीच वर्षाच्या दोन चिमुकल्या जुळ्या बहिणी गडचिरोली जिल्ह्यातील आसरअल्ली या त्यांच्या आजोळी अडकल्या. चिमुकल्याची आई तेलंगणा तील मंचेरीयल येथे होती. शुक्रवारी या चिमुकल्याची माता त्यांना घेण्यासाठी महाराष्ट्र तेलंगाना च्या सीमेवर पोहोचली. तेथेच या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन त्यांचे मामा आले होते. मात्र लॉकडॉऊनच्या काळातसीमाबंदी असल्याने पोलीसांनी चिमुकल्यांना तीच्या आईकडे हस्तांतरीत करण्यास नकार दर्शविला. अखेर महेशने तेलंगणा च्या वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांसोबत तेलगू भाषेत संवाद साधला त्याचवेळी महेशने गडचिरोली तील वरीष्ठ पोलीस अधिकार्यांशी संवाद साधला. आणि त्या दोन जुळ्या चिमुकल्याची त्यांच्या आईशी भेट झाली.

महेश तुझे खुप खुप अभिनंदन.. 
अडीच वर्षाच्या दोन जुळ्या बहिणी आपल्या मामांच्या कडेवर एकीकडे तर त्यांची आई दुसरीकडे उभी..आई आणि अडीच वर्षाच्या दोन चिमुकल्या यांच्यातील अंतर केवळ शंभर फुटांचे राहिले होते.. या दोघांच्याही मध्ये लॉकडॉऊनच्या आदेशाची अंमलबजावणी करणारे पोलीस उभे होते.. अडीच वर्षाच्या चिमुकल्यांना आईकडे जायचे होते.. आणि आपल्या दोन्ही चिमुकल्यांना कुशीत घेण्यासाठी मातृत्व अधिर झालं होतं.. पण लॉकडॉऊन असल्याने आईची आणि मुलींची भेट होत नव्हती.. महाराष्ट्र आणि तेलंगणा च्या सीमेवरील काळजाला हेलावून टाकणारा हा प्रसंग आहे.. एखाद्या चित्रपटाला साजेसा असलेल्या या ह्रदयस्पर्शी दृश्याने तेथे उपस्थित असलेल्या सर्वाचेच मन हेलावून टाकले होते. अडीच वर्षाच्या या दोन्ही जुळ्या बहिणी तेलंगणातील मंचेरीयल येथून सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली या गावी पंधरा दिवसांपुर्वी आजोळी आल्या होत्या.. मात्र त्यानंतर लगेचच लॉकडॉऊनची घोषणा झाली आणि दोन्ही चिमुकल्या आईविना आजोळी अडकल्या.. पंधरा दिवसांपासून त्यांना त्यांच्या आईकडे जायचे होते पण लॉकडॉऊन मध्ये राज्य प्रवेश बंदी असल्याने ठिकठिकाणी असलेल्या पोलीसांच्या नाकाबंदी मुळे या दोन्ही चिमुकल्या आईकडे जाऊ शकत नव्हत्या.. अखेर १० एप्रिल ला सायंकाळी या दोन्ही चिमुकल्याची आई महाराष्ट्र तेलंगाना सीमेवर पोहोचली.. इकडून या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन त्यांचे मामा सुध्दा सीमेवर पोहोचले.. पण आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि लॉकडॉऊनच्या नियमांनी चिमुकल्याची आईची भेट पुन्हा हुकवली.. तेवढ्यात प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तेथे पोहोचले. गडचिरोली चे पत्रकार महेश तिवारी यांना मराठी आणि तेलगू या दोन्ही भाषा अवगत असल्याने तेलंगणा आणि महाराष्ट्र पोलीसांनी त्यांनी संवाद साधला. वरीष्ठ अधिकार्‍यांनी एकमेकांशी संवाद साधला आणि या दोन्ही चिमुकल्याची त्यांच्या आईशी भेट झाली. आणि लेकरांच्या भेटीच्या प्रतिक्षेत असलेली माता दोन्ही चिमुकल्या मुलींना घेऊन आपल्या गावी रवाना झाली.