Saturday, 11 April 2020

सामाजीक बांधिलकी जपणारा महेश तिवारी

सामाजीक बांधीलकी जपणारा टीव्ही जर्नेलीस्ट महेश तिवारी 

पत्रकारीता करतानाच सामाजीक बांधिलकीची जाणीव ठेवत अनेक पत्रकार त्यांचं पत्रकारीतेत कार्य करीत आहेत. गडचिरोली सारख्या महाराष्ट्राच्या टोकावरून टिव्ही माध्यंमाकरीता रिपोर्टींग करणारा महेश तिवारी हा सामाजीक बांधिलकी जपणारा पत्रकार. पत्रकारीता करताना समजाप्रती आपलं काहीतरी
 
 
योगदान लागतं ही जाणीव ठेवत महेश तिवारीने दोन चिमुकल्याची त्यांच्या आईशी भेट घडवून आणली. लॉकडाऊन च्या काळात अडीच वर्षाच्या दोन चिमुकल्या जुळ्या बहिणी गडचिरोली जिल्ह्यातील आसरअल्ली या त्यांच्या आजोळी अडकल्या. चिमुकल्याची आई तेलंगणा तील मंचेरीयल येथे होती. शुक्रवारी या चिमुकल्याची माता त्यांना घेण्यासाठी महाराष्ट्र तेलंगाना च्या सीमेवर पोहोचली. तेथेच या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन त्यांचे मामा आले होते. मात्र लॉकडॉऊनच्या काळातसीमाबंदी असल्याने पोलीसांनी चिमुकल्यांना तीच्या आईकडे हस्तांतरीत करण्यास नकार दर्शविला. अखेर महेशने तेलंगणा च्या वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांसोबत तेलगू भाषेत संवाद साधला त्याचवेळी महेशने गडचिरोली तील वरीष्ठ पोलीस अधिकार्यांशी संवाद साधला. आणि त्या दोन जुळ्या चिमुकल्याची त्यांच्या आईशी भेट झाली.

महेश तुझे खुप खुप अभिनंदन.. 
अडीच वर्षाच्या दोन जुळ्या बहिणी आपल्या मामांच्या कडेवर एकीकडे तर त्यांची आई दुसरीकडे उभी..आई आणि अडीच वर्षाच्या दोन चिमुकल्या यांच्यातील अंतर केवळ शंभर फुटांचे राहिले होते.. या दोघांच्याही मध्ये लॉकडॉऊनच्या आदेशाची अंमलबजावणी करणारे पोलीस उभे होते.. अडीच वर्षाच्या चिमुकल्यांना आईकडे जायचे होते.. आणि आपल्या दोन्ही चिमुकल्यांना कुशीत घेण्यासाठी मातृत्व अधिर झालं होतं.. पण लॉकडॉऊन असल्याने आईची आणि मुलींची भेट होत नव्हती.. महाराष्ट्र आणि तेलंगणा च्या सीमेवरील काळजाला हेलावून टाकणारा हा प्रसंग आहे.. एखाद्या चित्रपटाला साजेसा असलेल्या या ह्रदयस्पर्शी दृश्याने तेथे उपस्थित असलेल्या सर्वाचेच मन हेलावून टाकले होते. अडीच वर्षाच्या या दोन्ही जुळ्या बहिणी तेलंगणातील मंचेरीयल येथून सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली या गावी पंधरा दिवसांपुर्वी आजोळी आल्या होत्या.. मात्र त्यानंतर लगेचच लॉकडॉऊनची घोषणा झाली आणि दोन्ही चिमुकल्या आईविना आजोळी अडकल्या.. पंधरा दिवसांपासून त्यांना त्यांच्या आईकडे जायचे होते पण लॉकडॉऊन मध्ये राज्य प्रवेश बंदी असल्याने ठिकठिकाणी असलेल्या पोलीसांच्या नाकाबंदी मुळे या दोन्ही चिमुकल्या आईकडे जाऊ शकत नव्हत्या.. अखेर १० एप्रिल ला सायंकाळी या दोन्ही चिमुकल्याची आई महाराष्ट्र तेलंगाना सीमेवर पोहोचली.. इकडून या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन त्यांचे मामा सुध्दा सीमेवर पोहोचले.. पण आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि लॉकडॉऊनच्या नियमांनी चिमुकल्याची आईची भेट पुन्हा हुकवली.. तेवढ्यात प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तेथे पोहोचले. गडचिरोली चे पत्रकार महेश तिवारी यांना मराठी आणि तेलगू या दोन्ही भाषा अवगत असल्याने तेलंगणा आणि महाराष्ट्र पोलीसांनी त्यांनी संवाद साधला. वरीष्ठ अधिकार्‍यांनी एकमेकांशी संवाद साधला आणि या दोन्ही चिमुकल्याची त्यांच्या आईशी भेट झाली. आणि लेकरांच्या भेटीच्या प्रतिक्षेत असलेली माता दोन्ही चिमुकल्या मुलींना घेऊन आपल्या गावी रवाना झाली.