Tuesday, 23 June 2020

MSEB Hidden Charges महावितरण कंपनीने ग्राहकांवर लादले अतिरिक्त चार्जेस

माननिय श्री फुलसिंह राठोड 
जनसंपर्क अधिकारी 
महावितरण अमरावती 

महोदय, 


महावितरण कंपनी कडून अ‍ॅक्च्युअल इलेक्ट्रीक बिला व्यतिरिक्त अतिरिक्त चार्जेस फार मोठ्या प्रमाणात आकारले जाते
हे अतिरिक्त शुल्क कमी करण्याची खरी गरज आहे. 
ते अतिरिक्त चार्जेस खालील प्रमाणे आहेत..


➡️ महावितरण कंपनीने विज बिलामध्ये चार प्रकारे भरमसाठ अतिरिक्त शुल्क आकारणी केल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणार आहे. 

➡️महावितरण कंपनी ने ग्राहकांवर लादलेले अतिरिक्त शुल्काचे वेगवेगळे चार प्रकार ग्राहकांना माहितच नाही. 

➡️ग्राहकाने प्रत्यक्षात वापरलेल्या वीजेच्या  बिलातील रकमेव्यतिरीक्त आकारण्यात आलेले हे अतिरिक्त शुल्क हे एप्रिल महिन्यात मुळ वीज बीलाच्या ७७ टक्के जादा आहे. 

➡️म्हणजे एखाद्या ग्राहकाचे एप्रिल महिन्याच्या वीज बीलाची मुळ रक्कम १०० रूपये असेल तर त्यावर ७७ रूपये अतिरिक्त शुल्काची आकारणी करण्यात आली आहे. म्हणजे त्या ग्राहकाला १७७ रूपये बिल भरावे लागणार आहे. 

➡️अतिशय छुप्या पध्दतीने महावितरण कंपनीने एप्रिल महिन्याच्या वीज देयकांत ७७ टक्के, मे महिन्याच्या विज बिलात ५४ टक्के आणि जुन महिन्याच्या विज बिलात ५४ टक्के अतिरिक्त वीज शुल्क  ग्राहकांवर लादले आहे. 

हे चार प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जातात.. 
➡️१)फिक्स चार्जेस म्हणजेच स्थिर आकार 

➡️२)व्हिलींग चार्जेस म्हणजेच वहन आकार 

➡️३) एफसीए चार्जेस म्हणजेच फ्युएल कॉस्ट अॅडजेस्टमेंट चार्जेस.. इंधन समायोजन आकार 

➡️४)एकूण वीज देयका च्या १६ टक्के अतिरिक्त वीज शुल्क म्हणजेच वीज शुल्क १६ %

👉अशा चार वेगवेगळ्या प्रकारे शुल्काची आकारणी करण्यात आली आहे. यातील "फ्यूल कॉस्ट अॅडजेस्टमेंट" इंधन समायोजन आकार.. या अतिरिक्त शुल्काची मे आणि जुन महिन्याच्या बिलात आकारणी केलेली नाही. विशेष म्हणजे ग्राहकांवर लादण्यात आलेले हे चारही अतिरिक्त शुल्क ज्या शुल्काला महावितरण "आकार" असे म्हणते हे ग्राहकाने प्रत्यक्षात वापरलेल्या" वीजेच्या आकारा व्यतिरिक्त" आहेत.

हे चार वेगवेगळे "आकार शुल्क" ग्राहकांवर लादण्यात येतात. हे शुल्क कमी झाले की मुळ देयकाची रक्कम कमी होईल. या करीता काही ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे 🙏 

उदाहरण दाखल.. 
आजच माझ्या घरचे तीन महिन्याचे एकत्रीत बील आहे. त्यातील एप्रिल महिन्याचे बील उदाहरण दाखल देतो.. 

१)एकुण वापरलेल्या युनिटचा वीज आकार - *८२४. २० रूपये* 

२)स्थिर आकार फिक्स चार्जेस - *९० रूपये* 

३)वहन आकार व्हिलींग चार्जेस - *२३२.९६ रूपये* 

४)इंधन समायोजन आकार म्हणजेच फ्युएल कॉस्ट अॅडजेस्टमेंट चार्जेस - *११४.४६ रूपये* 

५)वीज शुल्क १६ %..(वरील १+२+३+४ ची बेरीज केल्यानंतर आलेल्या रकमवेर) एकूण विज बिलाच्या १६ टक्के चार्जेस - *२०१. ८६ रूपये* 

👉माझे अॅक्चूअल बील बघा आणि अतिरिक्त चार्जेस बघा 

👉प्रत्येकाने त्यांचे आलेले बील तपासावे. बीलाच्या मागील बाजूस हे सर्व चार्जेस दिलेले आहेत 

👇👇👇👇👇
Actual bill - extra charges 
A)824.20-April --639.28
B)1349.05 -May -738.72
C)1347.12 -June - 731.68


महावितरण कंपनी मार्फत मुळ वीज वापरा च्या एकूण बिलावर हे चार प्रकारचे अतिरिक्त चार्जेस लावले जातात ते चार्जेस कमी करण्याची गरज आहे म्हणजे आपल्याला बिल कमी येईल 🙏 🙏 🙏 🙏 🙏 

🔴संजय पाखोडे 
९८२२२७४६७७ 
९८२३०२३८७५ 
 sanjay.pakhode@gmail.com

Saturday, 11 April 2020

सामाजीक बांधिलकी जपणारा महेश तिवारी

सामाजीक बांधीलकी जपणारा टीव्ही जर्नेलीस्ट महेश तिवारी 

पत्रकारीता करतानाच सामाजीक बांधिलकीची जाणीव ठेवत अनेक पत्रकार त्यांचं पत्रकारीतेत कार्य करीत आहेत. गडचिरोली सारख्या महाराष्ट्राच्या टोकावरून टिव्ही माध्यंमाकरीता रिपोर्टींग करणारा महेश तिवारी हा सामाजीक बांधिलकी जपणारा पत्रकार. पत्रकारीता करताना समजाप्रती आपलं काहीतरी
 
 
योगदान लागतं ही जाणीव ठेवत महेश तिवारीने दोन चिमुकल्याची त्यांच्या आईशी भेट घडवून आणली. लॉकडाऊन च्या काळात अडीच वर्षाच्या दोन चिमुकल्या जुळ्या बहिणी गडचिरोली जिल्ह्यातील आसरअल्ली या त्यांच्या आजोळी अडकल्या. चिमुकल्याची आई तेलंगणा तील मंचेरीयल येथे होती. शुक्रवारी या चिमुकल्याची माता त्यांना घेण्यासाठी महाराष्ट्र तेलंगाना च्या सीमेवर पोहोचली. तेथेच या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन त्यांचे मामा आले होते. मात्र लॉकडॉऊनच्या काळातसीमाबंदी असल्याने पोलीसांनी चिमुकल्यांना तीच्या आईकडे हस्तांतरीत करण्यास नकार दर्शविला. अखेर महेशने तेलंगणा च्या वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांसोबत तेलगू भाषेत संवाद साधला त्याचवेळी महेशने गडचिरोली तील वरीष्ठ पोलीस अधिकार्यांशी संवाद साधला. आणि त्या दोन जुळ्या चिमुकल्याची त्यांच्या आईशी भेट झाली.

महेश तुझे खुप खुप अभिनंदन.. 
अडीच वर्षाच्या दोन जुळ्या बहिणी आपल्या मामांच्या कडेवर एकीकडे तर त्यांची आई दुसरीकडे उभी..आई आणि अडीच वर्षाच्या दोन चिमुकल्या यांच्यातील अंतर केवळ शंभर फुटांचे राहिले होते.. या दोघांच्याही मध्ये लॉकडॉऊनच्या आदेशाची अंमलबजावणी करणारे पोलीस उभे होते.. अडीच वर्षाच्या चिमुकल्यांना आईकडे जायचे होते.. आणि आपल्या दोन्ही चिमुकल्यांना कुशीत घेण्यासाठी मातृत्व अधिर झालं होतं.. पण लॉकडॉऊन असल्याने आईची आणि मुलींची भेट होत नव्हती.. महाराष्ट्र आणि तेलंगणा च्या सीमेवरील काळजाला हेलावून टाकणारा हा प्रसंग आहे.. एखाद्या चित्रपटाला साजेसा असलेल्या या ह्रदयस्पर्शी दृश्याने तेथे उपस्थित असलेल्या सर्वाचेच मन हेलावून टाकले होते. अडीच वर्षाच्या या दोन्ही जुळ्या बहिणी तेलंगणातील मंचेरीयल येथून सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली या गावी पंधरा दिवसांपुर्वी आजोळी आल्या होत्या.. मात्र त्यानंतर लगेचच लॉकडॉऊनची घोषणा झाली आणि दोन्ही चिमुकल्या आईविना आजोळी अडकल्या.. पंधरा दिवसांपासून त्यांना त्यांच्या आईकडे जायचे होते पण लॉकडॉऊन मध्ये राज्य प्रवेश बंदी असल्याने ठिकठिकाणी असलेल्या पोलीसांच्या नाकाबंदी मुळे या दोन्ही चिमुकल्या आईकडे जाऊ शकत नव्हत्या.. अखेर १० एप्रिल ला सायंकाळी या दोन्ही चिमुकल्याची आई महाराष्ट्र तेलंगाना सीमेवर पोहोचली.. इकडून या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन त्यांचे मामा सुध्दा सीमेवर पोहोचले.. पण आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि लॉकडॉऊनच्या नियमांनी चिमुकल्याची आईची भेट पुन्हा हुकवली.. तेवढ्यात प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तेथे पोहोचले. गडचिरोली चे पत्रकार महेश तिवारी यांना मराठी आणि तेलगू या दोन्ही भाषा अवगत असल्याने तेलंगणा आणि महाराष्ट्र पोलीसांनी त्यांनी संवाद साधला. वरीष्ठ अधिकार्‍यांनी एकमेकांशी संवाद साधला आणि या दोन्ही चिमुकल्याची त्यांच्या आईशी भेट झाली. आणि लेकरांच्या भेटीच्या प्रतिक्षेत असलेली माता दोन्ही चिमुकल्या मुलींना घेऊन आपल्या गावी रवाना झाली.

Friday, 11 October 2019

कृषीमंत्री ना डॉ अनिल बोंडे शेतकऱ्यांचे तारणहार

कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांच्या कारकिर्दिवर विशेष लेख

*“कृषीमंत्र्यांच्या रूपाने शेतकऱ्यांना मिळाला तारणहार*”

*नव्वद दिवसांच्या कालावधीत कृषीमंत्री ‘डॉ अनिल बोंडे हे’ यांनी घेतले शेतकरी हिताचे निर्णय*
 
संपुर्ण देशातील जनतेला अन्नधान्य पुरविणारा शेतकरी जेव्हा संकटात असतो त्यावेळी त्या शेतकऱ्यांची मानसिकता काय होत असेल? याचा अंदाज हा शेतकऱ्यांनाच येऊ शकतो. आपल्या हक्काच्या योजनांपासून वंचित राहणारा शेतकरी हा राज्यकर्त्यांच्या नावे बोटं मोडतो. संबधीत सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही, कृषी विभागाच्या योजनांमध्ये अपात्र म्हणून शेरा मिळतो, त्यावेळी तो बळीराजा आपल्या नशिबालाच कोसतो. आणि, संकटाचा सामना करतो. शेतकऱ्यांचे हे सर्व दुख आणि त्यांच्या समस्यां हेरून त्या सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न राज्याचे कृषीमंत्री ना. डॉ अनिल बोंडे यांनी सुरू केले आहेत. भाजपा सरकारमध्ये तीन महिन्यांपुर्वीच  मोर्शी वरूड विधानसभेचे आमदार डॉ अनिल बोंडे यांनी कृषीमंत्री म्हणून पदभार स्विकारला. मुळातच शेतकरी असलेले डॉ अनिल बोंडे यांचा शेतीचा प्रचंड अभ्यास आहे.शेतीविषयक प्रश्नांचे ते जाणकार आहेत. व्यवसायाने डॉक्टर असल्याने  निरीक्षण  ,संशोधन आणि उपाय या माध्यमातून त्यांनी अवघ्या तीनच महिन्यात शेतकरी हिताचे निर्णय घेऊन बळीराजाला दिलासा दिला आहे. कृषी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आणि हा कणा मजबूत करण्याची जबाबदारी  राज्य सरकारच्या कृषी मंत्रालयाची आहे. या सर्व निकषांवर डॉ बोंडे हे खरे उतरले आहे.शेतकरी आणि शेतमजूरांच्या प्रगतीकरीता त्यांनी इमानेइतबारे प्रयत्न सुरू केले आहेत. अर्थातच, राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी डॉ बोंडे यांना ‘मंत्रीपदी’ नेमताना जो विश्वास दाखविला तो विश्वास प्रत्यक्षात सार्थ करण्याकरीता डॉ बोंडे यांनी यांनी कृषी विभागात सुरू केलेले बदल व सुधारणा ह्या अभिनंदनिय आहेत.
सततची नापिकी आणि दुष्काळ यावर उपाय म्हणून सरकारने सुरू केलेल्या पीक विमा योजनेचा लाभ  कठीण  निकष आणि  जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना अद्यापही मिळत नाही. पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी डॉ बोंडे यांनी पदभार स्विकारताच तातडीने निकष  व अटी  शिथील करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविला.यात उंबरठा उत्पन्नाचे निकष बदलविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सात वर्षातील सर्वाधीक उत्पादन असलेल्या एका वर्षातील उत्पन्न ग्राह्य धरणे आणि जोखीम स्तर ७० टक्क्यावरून ९० टक्के करणे असे बदल सुचविण्यात आले. तर विमा कंपनींचे प्रतिनिधी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बसतील हे बंधनकारक करण्यात आले. या बदलांचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल. शेती आणि शेतकरी जगवायचा  असेल तर नाविण्य पुर्ण योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.कृषी विभागाकडे असलेल्या पडीक जमिनीवर निमपार्क प्रकल्प राबविण्यात येणार आहे. भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रातील योगदान बघून त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे असा प्रस्ताव केन्द्र सरकारकडे पाठविण्यात आला. डॉ पंजाबराव देशमुख आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचे कृषीविषयक विचार सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याकरीता पुस्तिका काढण्यात येणार आहे. शेतमजूरांकरीता धोरणात्मक योजना राबविण्यात येणार आहे.अत्याधूनिक सोईने युक्त असे अमरावती येथे कृषीभवनाची निर्मिती होणार आहे.
इंडो-इस्रायल तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागपुर, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांमध्ये सिट्रस इस्टेट प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे.विदर्भाच्या दृष्टीने हा अत्यंत मैलाचा दगड ठरणार आहे. राष्ट्रीय कृषीविकास योजना अर्थात ‘रफ्तार’ च्या प्रभावी अंमलबजावणीकरीता प्रशासकिय मान्यता प्रदान करण्यात आली. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ  अधिकाअधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याकरीता योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेकरीता  शेतकरी कुटूंबातील सर्व ठिकाणचे लागवडीलायक क्षेत्र दोन हेक्टर पर्यंत असावे ही अट शिथील करण्याकरीता पुढाकार घेतला.राज्यातील अनुसूचीत जाती व नवबौध्द शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याकरीता डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील विशेष घटक योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.कृषी विषयक योजनेतील शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडविण्याकरीता असलेल्या समितीत शेतकऱ्यांचे दोन प्रतिनिधी घेण्याचा निर्णयही डॉ बोंडे यांनी घेतला. आजच्या काळाची गरज ओळखून सेंद्रीय शेती विषमुक्त शेती करण्याकरीता डॉ पंजाबराव देशमुख जैविक मिशनच्या माध्यमातून या वर्षी दहा कोटी रूपयांची तरतूद करून निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला.यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल.
‘गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची’ व्याप्ती वाढविण्यात आली आहे. या पुर्वी शेतकरी कुटूंबातील कोणत्याही एका सदस्यालाच या योजनेचा लाभ मिळत होता. आता या नंतर या योजनेत वय वर्ष १० ते ७५ दरम्यानच्या  शेतकरी कुटूंबातील दोन सदस्यांकरीता योजना राबविण्यास मंजूरी देण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री शास्वत सिंचन योजनेत’  विदर्भ मराठवाड्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांचा समावेश करण्याचा निर्णयही डॉ बोंडे यांनी घेतला. त्याचप्रमाणे ‘नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाची’ व्याप्ती वाढवून २ ते ५ हेक्टर पर्यंत शेतीधारण करणाऱ्या शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.यातील अर्थसहाय्याच्या प्रमाणातही वाढ करण्यात आली.अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांकरीता असलेली बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत १०० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.या व्यतिरीक्त राष्ट्रीय शास्वत शेती अभियान राबविण्याकरीता ४३ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.गटशेतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. जेणेकरून शेतकऱ्यांना शेतात लागणारी महागडी अवजारे विकत घेण्याची गरज पडणार नाही.कृषी सहाय्यकांना ग्रामपंचायतीमध्ये बसण्याची जागा उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकांची भेट सुलभ करून देण्याचे महत्वाचे काम कृषीमंत्र्यांनी केले.
कृषीपयोगी १३ योजनांची माहिती एका क्लिक वर उपलब्ध करून ‘महाडिबीटी पोर्टल’ सुरू करण्यात आले आहे. या पोर्टल मध्ये शेतकऱ्यांची सर्व माहिती संकलीत करणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषीव्यवसाय व ग्रामिण परिवर्तन अर्थात ‘स्मार्ट’ ही जागतीक बँकेची २१०० कोटी रूपयांची  अर्थसह्ाय्यीत योजना तातडीने राबविण्यास सुरूवात झाली आहे.ठाणे येथे शेतकरी भवन,महाराष्ट्र कृषी औद्योगीक विकास महामंडळाचे बळकटीकरण, मोर्शी येथे कृषी महाविद्यालय,कृषी संवाद केंद्र,अनुकंपा तत्वावर नियुक्त्या,इत्यादी महत्वपुर्ण निर्णय कृषीमंत्र्यांनी अवघ्या तीन महिन्याच्या कालावधीत घेतले. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व सहाही महसूली विभागात कृषीखात्याच्या बैठकी घेऊन शेतीविषय योजना मार्गी लावण्यात आल्या. मिळालेल्या संधीचे सोने करायचे हा डॉ बोंडे यांचा निर्धार असल्यानेच अवघ्या तीन महिन्याच्या कालावधीत शेतकरी हिताचे निर्णय घेऊन त्यांच्या पर्यंत लाभ पोहोचविण्याचे प्रामाणिक प्रयत्न डॉ बोंडे यांनी केले.त्यांच्या या कार्यकतृत्वाला मानाचा मुजरा.

*-मोरेश्वर वानखडे* 
कार्यकारी परिषद सदस्य
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 
अकोला

Tuesday, 23 May 2017

CV Sanjay Pakhode Journalist


Sanjay Pakhode
Special Correspondent, Dainik Divya Marathi, DBCORP Ltd Bhaskar Group
Experience of Print and Electronics Media- 25th Year of Journalism
Date Of Birth-10/06/1970:
7,Pramod Colony, Behind
Tapar Hostel,Narhari Nagar, Rajapeth Amravati
Dist. Amravati 444606
9823023875 / 9822274677
sanjay.pakhode@gmail.com

EXPERIENCE

Divya Marathi, Bhaskar Group- Special Correspondent

@ Amaravati  June 2013 to - PRESENT

Punya Nagari, Nagpur- Chief Reporter

@ Nagpur  Nov  2012  to -May 2013

SAAM TV Sakal Media Group  AmravatiSr. Reporter

@Amravati, Nagpur Feb 2008 - Sept 2012

ETV Marathi Newstoday, Eenadu NagpurSr. Reporter

@Amravati, Nagpur and Hyderabad from  April  2000 - Jan 2008

Dainik Janmadhyam  Amravati — Reporter/Sub-Editor

@Amravati,  Jan 1992- March 2000

Maharashtra Times, Loksatta  Amravati — Free Lancer

@Amravati, as Freelance Journalist  1995 - 2000


EDUCATION

Amravati UniversityMJMC (PG Degree In Journalism)

July 2011 to May 2013

YCMOU Nashik  University - B.A. MCJ ( Degree In Journalism)

July 2008 to May 2011

Amravati University - Diploma Library Science (Diploma In Libray and Information Science)

July 2011 to May 2013


SKILLS

  • Field Reporting, Catchy Script Writing, News
  • Analysis,Column Writing,Investigative Stories, Case Study,Data analysis, Strong Sources in Social, Political,and Bureaucracy. Event Management ,Making of Special Stories,Special News and current affair Stories , Human Interest, Copy Editing, Video Editing, Photography,   Coordination, Content Planning,Execution
  • DSNG LIVE Reporting: Two Months Training in Video Journalism By TIV  Corporation US @Mumbai

AWARDS

State Government Prof. P. L. Deshpande award for Best Story in Electronics Media for 2005 and 2006.Rajmata Jijau Jalmitra Award for special story series in Divya Marathi on Jalyukta Shiwar Writing  

LANGUAGES

English, Hindi and Marathi